Ind Vs Pak Match Malvan JCB Operation On Muslim Owner Scrap Shop | Nilesh Rane Warning | Malvan News | भारताच्या विजयानंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा: मालवणमध्ये परप्रांतीय भंगार विक्रेत्याच्या दुकानावर पालिकेने चालवला जेसीबी – Mumbai News

[ad_1]

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारताच्या विजयामुळे देशभरात जल्लोष करण्यात आला. मात्र मालवणमध्ये या जल्लोषाला गालबोट लावण्याचा प्रकार घडल

.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयानंतर, मालवणमधील काही मुस्लिम तरुणांनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, मालवणमधील सर्व हिंदू युवकांनी रात्री या व्यक्तींना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर, दुपारी देऊळवाडा पुलावरून हिंदू समाजाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान, एका परप्रांतीय भंगार व्यावसायिकाकडून भारत विरोधी घोषणा देण्यात आल्याची घटना घडली. यावर नागरिकांनी त्या व्यक्ती विचारणा केली असता, त्याने अरेरावी केली. संतप्त नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी एका कुटुंबातील तिघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये एकाला अटक करण्यात आली, तर एक जण अल्पवयीन असल्याने त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. प्रशासनाने संबंधित परप्रांतीय भंगार व्यावसायिकाची बेकायदेशीर झोपडी जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकली. आमदार निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली.

काय म्हणाले नीलेश राणे? मालवणात एका मुसलमान परप्रांतीय भंगार व्यावसायिकाने भारत पाकिस्तान मॅचनंतर भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप करत त्याचे दुकान उद्ध्वस्त करण्यात आले आहे. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच, पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त करून टाकला. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार, असे ट्विट आमदार नीलेश राणे यांनी केले आहे.

[ad_2]

Leave a Comment