महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर बुधवारी प्रयागराजमधील महाकुंभाचे अंतिम अमृतकुंभ स्नानाने तेथील कुंभमेळ्याची सांगता हाेईल. यानंतर सर्व आखाडे, चार संप्रदायांच्या हजाराे साधू-महंतांसह काेट्यवधी भाविकांना नाशिक व त्र्यंबकेश्वरला २०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंहस
.
मात्र या वेळी महायुती सरकारमधील अंतर्गत संघर्षामुळे ही परंपरा खंडित झाली. नाशिकचा पालकमंत्री कोण हेच ठरवण्यात मुख्यमंत्र्यांना यश येत नसल्याने हे निमंत्रण सर्व संबंधितांना देण्यास उशीर झाल्याची माहिती आहे. प्रयागराजमध्ये ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुुंभात १३ आखाडे व चार संप्रदायांचे साधू-महंत सहभागी झाले
भावी यजमानांकडून दिले जाते साधू-संतांना निमंत्रण
२०१५ मध्ये नाशिक कुंभमेळ्यातील साधूंना उज्जैनचे निमंत्रण देण्यासाठी मध्य प्रदेशचे तत्कालीन मंत्री शिवराजसिंह चाैहान आले हाेते. त्यानंतर मुख्यमंत्री याेगी यांनी उज्जैनच्या कुंभमेळ्यात जाऊन प्रयागराज महाकुंभाचे निमंत्रण दिले हाेते. महाराष्ट्र सरकारने प्रयागला जाऊन सर्व आखाडे व साधू-महंत यांना निमंत्रण देणे अपेक्षित हाेते. तसे स्थानिक साधू-महंतांनी त्यांना सुचवले पण हाेते. ते झाले नाही.
पहिल्यांदाच खंडित झाली परंपरा
प्रयागराजनंतर नाशिक व त्यानंतर उज्जैनचा कुंभमेळा हाेताे. त्यामुळे प्रयागच्या महाकुंभात प्रशासनाकडून नाशिकला येण्याचे निमंत्रण दिले जाते. ही परंपरा आतापर्यंत पाळण्यात येत हाेती. या वर्षीच ती खंडित झाली आहे. -श्रीमहंत भक्तिचरणदास, प्रवक्ते दिगंबर आखाडा
मुख्यमंत्र्यांनाच पालकमंत्रिपद द्यावे
नाशिक जिल्ह्याला पालकमंत्रीच नसल्यामुळे औपचारिक निमंत्रणाची प्रक्रिया प्रशासनास पूर्ण करता आलेली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाशिकचे पालकमंत्री व्हावे. त्यामुळे आगामी नियाेजनात अशा स्वरूपाचे अडथळे निर्माण हाेणार नाहीत. – श्रीमहंत सुधीरदास महाराज, निर्वाणी आखाडा
गेल्या वेळी देण्यात आले हाेते छापील निमंत्रण
२०१३ साली प्रतत्कालीन मुख्यमंंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, नाशिकचे साधू-महंत, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २०१५ च्या नाशिक कुंभमेळ्याचे िनमंत्रण प्रयागला जाऊन दिले होते. या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंानी प्रयागराज येथील संगमात स्नान केले. मात्र राजकीय विसंवादामुळे त्यांना नाशिकच्या कुंभाचे निमंत्रण देणे शक्य झाले नाही.
व्यक्तिश: जाऊन निमंत्रण देणार
सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा धार्मिक उत्सव असून साधू-महंत हे आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे आगामी कुंभमेळ्याचे निमंत्रण सर्व आखाडे, संप्रदायांना प्रत्यक्ष भेटून देण्यात येईल. – गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, माजी पालकमंत्री
भुसे-महाजन वादात पालकमंत्रिपद स्थगित
शिंदे सरकारच्या काळात दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री होते. मात्र आता फडणवीस सरकारमध्ये त्यांच्या जागी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावरून महायुतीतील शिंदेसेना व भाजप या दोन घटक पक्षांत वाद सुरू झाला होता. त्यामुळे नियुक्तीनंतर काही दिवसांतच मुख्यमंत्र्यांनी महाजनांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्याल दीड महिना लोटला तरी अजून नवे पालकमंत्री नेमले नाहीत.