महाराष्ट्रात पेशवाई किंवा मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याच्या धमकीवर उपस्थित केला आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा पुरोहित वर्गातला आहे. जिवे मारणे एवढे सो
.
छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राह्मण धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत. पण या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून मी ही रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे, असे सावंत यासंबंधी म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार लक्ष्मण सावंत यांनी उपरोक्त संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात पेशवाई, मोगलाई आहे का?
लक्ष्मण माने म्हणाले, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी देणारा पुरोहित वर्गातला आहे. जीवे मारणे एवढे सोपे असेल तर तू, राहूल सोलापूरकर आणि ब्राह्मण संघाचे कुणी असतील तर त्यांनी फक्त सावंतांच्या केसाला धक्का लावून दाखवावा. मग तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत. मुख्यमंत्र्यांच्या जिवावर जिवे मारण्याच्या धमक्या देत असाल तर महाराष्ट्रात पेशवाई, मोगलाई आहे का? असे म्हणत लक्ष्मण माने यांनी थेट यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांनाच लक्ष्य केले आहे.
फडणवीस ब्राह्मण आहेत, हे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे
एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी 20 मार्च रोजी महाड येथून चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या राज्यव्यापी परिषदेची सुरुवात करण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपराकार लक्ष्मण माने यांनी इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणावर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, तोंड फुकटचे आहे म्हणून काहीही बोलू नका. आम्हालाही बोलता येते, पण आम्ही बोलतो का? फडणवीस ब्राह्मण आहेत, हे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे.
फडणवीसांचे म्हणजे हे पेशव्याचे राज्य नाही
महाराष्ट्रात बहुमत फडणवीसांकडे आहे. आम्ही लोकशाही मानतो. त्यांना आम्ही मुख्यमंत्री मानलेच आहे. परंतु, त्यांचा आधार घेऊन कुणी जीवे मारण्याच्या धमक्या देत असेल, तर महाराष्ट्रात पेशवाई, मोगलाई लागून गेलीय का? असा सवाल ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी केला. फडणवीसांचे म्हणजे हे पेशव्याचे राज्य नाही. हे संविधानाने निर्माण झालेले राज्य आहे. फडणवीसांना आम्ही भविष्यात बहुमताच्या जोरावर हटवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ॲट्रॉसिटीचे खरे गुन्हे 5 टक्के देखील नाहीत. 95 टक्के गुन्हे हे बोगस असल्याचे सांगून ‘उपराकार’ माने पुढे म्हणाले की, दोन पाटलांची भांडणे हेच ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होण्याचे खरे कारण आहे. एका पाटलाने एकाला आणि दुसऱ्याने दुसऱ्याला हाताशी धरून एकमेकांवर गुन्हा दाखल करायला लावायचा. अशाने कोर्टात काहीही सिध्द होत नाही. त्यामुळे ॲट्रॉसिटीचा पूर्वीचा कायदा जसाच्या तसाच राहिला पाहिजे. तरच त्या कायद्याचा धाक निर्माण होईल आणि अस्पृश्यता कमी होईल.