Maharashtra Legislative Committees announced under the chairmanship of the Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधिमंडळ समित्या जाहीर: सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदावर राहुल कुल, कोणाकोणाची वर्णी लागली? – Mumbai News

महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात महाराष्ट्र विधिमंडळाच्या 2024-25 या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांची नियु

.

मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार, सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदावर पुण्यातील दौंड मतदारसंघाचे भाजपचे नेते राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदावर रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांची वर्णी लागली आहे. आश्वासन समितीच्या अध्यक्ष पदावर रवी राणा यांची, तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष पदी नारायण कुचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अनुसूचित जमाती कल्याण समितीवर राजेश पाडवी, तर महिला हक्क व कल्याण समितीवर मोनिका राजळे या अध्यक्ष राहणार आहे. इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर किसन कथोरे, मराठी भाषा समिती पदावर अतुल भातखळकर, विशेष हक्क समितीवर राम कदम, धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समितीवर श्रीमती नमिता मुंदडा, आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्ष पदावर सचिन कल्याणशेट्टी हे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या कोट्यातील समित्यांचे वाटप अद्याप झाले नाही. विधानसभा अध्यक्षांनी विविध समित्यांच्या संदर्भात नव्या नियुक्त्या सर्व पक्षीयांकडून होत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. तर मंत्रिपद हुकलेल्या भाजप आमदारांचे समितीच्या मार्फत राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे. तसेच या समित्यांचे वाटप महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार होणार असल्याचे बोलले जात आहे. विधिमंडळाच्या एकूण 29 समित्या असतात, त्यातील भाजपच्या वाट्याला 11 समित्या आल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment