छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तुंग कार्यकर्तृत्व, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू राज ठाकरे यांनी गुरुवारी कवितेतून मांडले. मराठी दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित या सोहळ्यात विकी कौशल, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे आणि आशा भोसले,
.
संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती शिवाजी पार्क मैदानात भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित केले. या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने कवितांची मैफलही रंगली. त्यात राज यांनी ‘कोण तूं रे कोण तूं कालिकेचे खड्ग तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ? जानकीचे अश्रू तूं ? की उकळता लाव्हाच तूं ? खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतील त्वेष तूं ? वाल्मीकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ? भगीरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ? अशा ओळींतून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू मांडले. आपली भाषा टिकवण्यासाठी भाषा किती महत्त्वाची असते, ती कशी टिकवली पाहिजे, कशा प्रकारे टिकवली पाहिजे, यावरचे जावेद अख्तर यांचे एक भाषण मी ऐकले होते. त्यामुळे सोनाराने जसे कान टोचावे लागतात, तसे करण्यासाठी अख्तर यांना या सोहळ्याला निमंत्रित केल्याचे राज यांनी सांगितले.
भाषेचा दररोज अभिमान बाळगा
प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले की, भाषा ही रोज बोलायची आणि एखाद्या दिवशी तिचा अभिमान बाळगायचा अशी गोष्ट नाही. तिचा अभिमान रोज बाळगला पाहिजे आणि रोज बोलली पाहिजे. भाषा जन्मायला ५०० ते हजर वर्षे लागत असतील तर भाषेच्या मृत्यूलाही प्रदीर्घ काळ लागतो. बेइज्जत व्हायला लागली की भाषा मरायला सुरुवात होते. आपली मराठी बेइज्जत होते त्याची चिंता मला खूपदा वाटत राहते. काहींना मराठी बोलायला लाज वाटते. मध्येमध्ये इंग्रजी बोलतात म्हणजे कसं खूप भारी वाटतं. मोराला पिसारा असतो तसा माणसांना इंग्लिशचा तुरा असतो. इंग्लिश बोललो तर आपण भारी आहोत, असं वाटतं.
विकी कौशलचाही मराठी बाणा
“छावा’ सिनेमामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला हिंदी अभिनेता िवकी कौशलने कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता सादर केली. तत्पू्र्वी तो म्हणाला की, इथे एकापेक्षा एक लोक कविता सादर करत होते. त्या वेळी आशा भोसलेंनी खूपच घाबरत माझ्याकडे पाहिले आणि त्यांनी मला विचारले की तू पण कविता वाचणार आहेस का? मी त्यांना सांगितले हो… त्यांनी परत विचारले मराठीत? मी म्हटलं हो…त्या म्हणाल्या तोबा तोबा. राज यांनी जेव्हा मला सांगितले की कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता तुम्हाला म्हणायची आहे. मी त्यांना विचारले, सॉरी, पण ‘कणा’ याचा अर्थ काय. त्यावर ते म्हणाले की, कणा म्हणजे स्पाइन. आणि छावा िसनेमा केल्यानंतर मला या शब्दाचा अर्थ समजला.