Massive fire breaks out at electric scooter company in Pune | पुण्यातील इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीत भीषण आग: कोट्यवधींचे नुकसान; 150 दुचाकी जळाल्या, कामगारांची सुटका – Pune News

पुणे शहरातील कात्रज परिसरात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत मंगळवारी दुपारी चार वाजून आठ मिनिटांनी भआग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीतील विविध साहित्याने अल्पावधीत भीषण पेट घेतल्यानंतर आग माेठ्या प्रमाणात पसरली व धुराचे लाेट आकाशात झेपाव

.

पुण्यातील कात्रज-गुजरवाडी रस्त्यावर साई इंडस्ट्रिअल इस्टेट हा औद्याेगिक परिसर आहे. सदर ठिकाणी भषण एंटरप्रायजेस नावाची इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणारी एक कंपनी आहे. सदर ठिकाणी सुमारे दाेन हजार इलेक्ट्रिक बाईक बनविण्याचे साहित्य ठेवण्यात आले हाेते. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक कंपनीत कंपनीत भीषण आग लागली. आग लागल्याने कंपनीत माेठी धावपळ उडाली आणि भयभीत झालेले कंपनीतील कामगार तातडीने बाहेर पळाल्याने पुढील अनर्थ टळला. कंपनीतील वेगवेगळया सााहित्याने माेठा पेट घेतल्यानंतर आग भडकली गेली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे गंगाधाम, कात्रज, काेंढवा बुद्रुक, पीएमआरडीए येथील सहा बंब आणि तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्रातील अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन तासाभरानंतर ही आग आटोक्यात आणली त्यानंतर कुलिंगचे काम करण्यात आले. आगीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.दरम्यान, आगीत कंपनीतील वाहनांचे सुटे भाग, बॅटरी,तसेच अन्य साहित्य जळून काेट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Comment