Mayor’s murder over political dispute, accused Sunny Jadhav granted bail by High Court after eight years | राजकीय वादातून नगराध्यक्षाचा खून: आठ वर्षांनंतर आरोपी सनी जाधवला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर – Pune News

शिरूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेंद्र हिरामण मल्लाव यांच्या खुनाप्रकरणी आरोपी सनी जाधव याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एन.आर.बोरकर यांनी हा निर्णय दिला.

.

28 ऑगस्ट 2016 रोजी ही घटना घडली होती. पूर्वीपासूनच्या राजकीय वादातून कुर्लप यांच्या वाढदिवसाला विरोध केल्याच्या कारणावरून हा खून झाला. रामआळी ते कापडबाझार रस्त्यावर ऍक्टिव्हा गाडीवर उभे असलेले मल्लाव यांच्या डोक्यात व शरीरावर कोयता आणि सत्तूरने वार करण्यात आले.

सदर प्रकरणात मयत महेंद्र हिरामण मल्लाव (नगराध्यक्ष शिरूर नगरपालिका) यांचे पुतणे गणेश जयसिंग मल्लाव यांच्या फिर्यादीनुसार पूर्वीपासूनच्या राजकीय वादातून कुर्लप यांच्या वाढदिवसाला विरोध केला म्हणुन आरोपी यांनी रामआळी ते कापडबाझार ह्या रस्त्यावर ऍक्टिव्हा गाडी घेऊन उभे असलेले मयत महेंद्र हिरामण मल्लाव यांच्या डोक्यात व इतर शरीरावर कोयताने व सत्तूराने वार करून त्यांचा खून केला. कोयत्याने आरोपी वार करत असताना मयत महेंद्र हिरामण मल्लाव यांनी त्यांना हाताने अडवण्याचा प्रयत्न केला व आरडाओरडा केला व त्या आवाजाने फिर्यादी हे तेथिलच एक दुकानात काम करत असताना सदर आवाज ऐकून बाहेर आले व त्यांनी सर्व घटना समक्ष पहिली व त्यांनीही आरडाओरडा करून लोकांना बोलावण्याचा प्रयत्न केला. सदर आरोपींनी आरडाओरडा झाल्याचे समजताच त्यांनी सोबत आणलेल्या ऍक्टिव्ह गाडीवर दोघे दोघे असे बसून तेथून निघून गेले. या खटल्यात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी सनी जाधव यांचा जामीनाचा अर्ज फेटाळला. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात जमिनाकरिता दाद मागितली.

आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करत सदर आरोपीची ह्या घटनेतील भूमिकेला भा. दं. वि कलम 302 लागू होत नसून आरोपीस विनाकारण जवळपास आठ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला आहे आणि खटला कमी कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यास सरकारी वकील यांनी विरोध करत जामीन नामंजूर करावा असा युक्तिवाद केला. सदर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाच्या आरोपीस जामीन मंजूर केला.

Leave a Comment