राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्बल 26 एकर जमीन हडप केल्याचे समोर आले आहे. हा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाता
.
याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याचे देखील माहिती पुढे आली आहे. अनिल गोटे यांनी यावेळी जयकुमार रावल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल गोटे म्हणाले, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांना देखील जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोडले नसून इतर गरीब कुटुंबीयांचे काय? असा प्रश्न देखील अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.
जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन हडप केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिंदखेडातील गरिबांना न्याय कोण देणार? असा देखील प्रश्न अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, जयकुमार रावल हे 2004 पासून ते 2024 असे सलग पाचवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद देखील त्यांनी भूषविले आहे. पर्यटन, अन्न औषध, राजशिष्टाचार या खात्याचा कारभार त्यांनी सांभळला. तर 2014 च्या निवडणूकीत पाचव्यांदा त्यांनी 96 लाख मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, धुळे जिल्ह्यात पहिल्यांदा महायुतीचे सर्व 5 आमदार निवडून आणण्यात रावल यांचा मोठा वाटा असल्याचेही बोलल्या जात आहे. त्यात आता जयकुमार रावल यांच्याकडे मंत्रीपदही देण्यात आले आहे.