राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पुण्यातील बलात्कार प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मंत्री म्हणून आपण कायद्याच्या चौकटीत राहून बोलले पाहिजे. पण एक सामान्य नागरीक म्हणून अशा आरोपींना रस्त्यावर ठेचून मारले पाहिजे. या विकृत कृत्याव
.
पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. ती आज दुपारी समोर आली. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी उपरोक्त संतप्त भावना व्यक्त केली आहे.
मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना म्हणाले की, मंत्री म्हणून आपण कायद्याच्या चौकटीत राहून बोलले पाहिजे. पण एक सामान्य नागरीक म्हणून अशा आरोपींना रस्त्यावर ठेचून मारले पाहिजे. या विकृत कृत्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. संजय शिरसाट यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना वेड्याची उपमा दिली. संजय राऊत हा वेडा माणूस आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. पण फडणवीस आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे.
अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत बोलताना शिरसाट यांनी पुष्टी केली की भेट झाली, मात्र चर्चेचा तपशील कोणालाही माहित नाही. त्यांनी राऊत यांना ‘भटकता आत्मा’ अशी उपमा दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे प्रकरणात केलेल्या टीकेला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, सुळे यांना या प्रकरणात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या काळात अनेक आरोपी मंत्री कारभार सांभाळत होते, असा टोला त्यांनी लगावला.