Mumbai Crime News Update | Burned Mother In Law Alive Over Divorce Case | जावयाने सासूला जाळले अन् स्वतःही जळाला: मुंबईतील भयंकर घटना; 10 वर्षापूर्वीच्या घटस्फोटाला सासू जबाबदार असल्याचा आला होता राग – Mumbai News

10 वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटासाठी जबाबदार असल्याचा राग मनात धरून एका जावयाने आपल्या सासूला जिवंत जाळल्याची भयंकर घटना मुंबईच्या मुलुंड भागातील नाणेपाडा परिसरात घडली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली. तेव्हा पोलिसांना या हत्याकांडाची कोणतीही माह

.

पोलिसांच्या माहितीनुसार, बाबी दाजी उसरे (72) असे मृत महिलेचे, तर कृष्णा अटनकर (59) असे आरोपी जावयाचे नाव आहे. कृष्णा अटनकरचे बाबी उसरे यांच्या मुलीशी लग्न झाले होते. या दाम्पत्यांत अनेकदा वाद व्हायचा. या कौटुंबिक कलहाला कंटाळून कृष्णा अटनकर यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. 10 वर्षांपूर्वी या दोघांचा घटस्फोटही झाला होता. या घटस्फोटाला आपली सासू बाबी उसरे कारणीभूत असल्याचा संशय कृष्णाच्या मनात होता. घटस्फोट झाल्यानंतर कृष्णाची पत्नी मुलुंड येथील आपल्या माहेरी आली होती. ती आपल्या 20 वर्षीय मुलासोबत तिथे राहत होती.

टेम्पोमध्ये पेट्रोल व थिनर टाकून पेटवून दिले

कृष्णा अनेकदा या दोघांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात होता. यावरून कृष्णा व बाबी यांच्यात वाद झाला होता. सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास तो पुन्हा त्यांच्या घरी गेला. त्यावेळी त्याने बाबी यांना रुग्णालयात नेण्याचे कारण सांगून त्यांना आपल्या मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोतून घेऊन गेला. त्यानंतर घरापासून काही अंतरावर टेम्पो पार्क केला. त्याने टेम्पोचा मागचा दरवाजा बंद करून बाबी यांच्या डोक्यात हातोड्याने वार केला. त्यामुळे बाबी उसरे बेशुद्ध पडल्या. ही संधी साधून कृष्णा अटनकर याने बाबी यांच्या अंगावर पेट्रोल व थिनर ओतून त्यांना पेटवून दिले.

सासूला जाळून स्वतःही केली आत्महत्या

त्यानंतर स्वतःच्याही अंगावरही पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केली. या परिसरातून जाणाऱ्या वाटसरूंना टेम्पोतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. त्याने ती गोष्ट अग्निशमन दलाला कळवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवून टेम्पोचे दार उघडले तेव्हा त्यांना आतमध्ये जावई कृष्णा व सासू बाबी यांचे मृतदेह पडल्याचे आढळले. घटनास्थळी हातोडा, थिनरची बाटली, लायटरही होते.

या घटनेनंतर मुलुंडचर्या नवघर पोलिसांनी प्रारंभी अपमृत्युची नोंद केली. बाबी उसरे व कृष्णा अटनकर या दोघांनी आत्महत्या केली असावी असे त्यांना वाटले. पण नंतर चौकशीमध्ये हा हत्येचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

Leave a Comment