महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठण नगरीत येणाऱ्या २० मार्च रोजी शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी उत्सव होणार आहे. राज्यातील हा प्रसिद्ध उत्सव अवघ्या २३ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर ते
.
रस्त्यावर अतिक्रमण;वाहनधारक त्रस्त बिडकीन पैठण रोडवरील साई मंदिराजवळ दररोज तीन ते चार कि.मी. रांगा लागत असतात. महामार्ग पोलिसांना या रस्त्यावर पेट्रोलिंगचे वावडे दिसून येते. कांचनवाडीपासून रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अर्ध्याच्या वर मोटार सायकली, भाजीपाला विकणाऱ्या हातगाड्या तसेच खाद्य पदार्थ विकणारे यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असतो. मात्र, याकडे पोलिस विभागाकडून कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण आता वारकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.