राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाने महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे आणि एमएससी विद्यार्थिनी मरसियाना सिल्वेस्टर यांनी चालत्या वाहनातून वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. या संश
.
संशोधकांनी पिझोइलेक्ट्रिक मटेरियलचा वापर करून दबाव यंत्र विकसित केले आहे. वाहन चालत असताना या यंत्रातून वीज निर्माण होईल. ही वीज संग्रहित करून वाहन चालवण्यासाठी वापरता येईल. पिझोइलेक्ट्रिक पदार्थ स्वस्त असून कमी खर्चात वीज निर्मिती करतो.
या तंत्रातून होणारी वीज निर्मिती पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कार्बन डायऑक्साइडची निर्मिती होत नाही. सध्या विद्युत वाहनांसाठी लागणारी वीज पॉवर प्लांटवर अवलंबून असते. त्यासाठी कोळसा आणि पाण्याचा वापर करावा लागतो. नवीन तंत्रामुळे चालत्या वाहनातूनच वीज निर्माण होईल आणि ऊर्जेची बचत होईल.
डॉ. ढोबळे यांचे हे ९५वे पेटंट आहे. वाढते प्रदूषण आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नेहमीच समाजपयोगी संशोधनावर भर देत असून, या संशोधनामुळे विद्यार्थी आणि विद्यापीठाची गुणवत्ता वाढणार आहे.

