Nitesh Rane Criticizes Uddhav Thackeray Over Neelam Gorhe Case | Eknath Shinde, Shiv Sena | ‘मातोश्री’वर जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही नेत्यांचे: मंत्री नितेश राणेंनी सर्वच काढले; एकनाथ शिंदेंनीही बिले भरल्याचा दावा – Mumbai News

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही उमेदवारांकडून दिले जाते. ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे. अशा सर्वांना हे सत्य माहिती असल्याचा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे

.

शिवसेनेचा इतिहास ज्यांना – ज्यांना माहिती आहे. त्यात नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील. जे जुने शिवसैनिक आहेत. त्या प्रत्येकाला नीलम गोऱ्हे जे बोलल्या, ते सत्य असल्याचे माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हे यांची पाठराखण करायलाच हवी. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांची असंख्य बिले ही एकनाथ शिंदे यांनी देखील भरलेली असल्याचा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरी जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, गाडीचे पेट्रोल, खासगी विमानाचे बिल तसेच घरातील एसी देखील त्यांचा नाही. हे सर्व आम्हाला माहिती आहे. त्यामुळे कधीतरी त्यांनी खुल्या रंगमंचावर येऊन चर्चा करावी, अशी मागणी देखील राणे यांनी केली आहे. हे सर्व आम्ही पुराव्या सगट द्यायला तयार आहोत. नीलम गोऱ्हे या काहीच वाईट बोलल्या नाहीत. मात्र, मातोश्रीच्या वहिनींना ते सत्य असल्यामुळे झोंबले असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….

Leave a Comment