Parbhani Rape Case Update Tortured Minor Girl | परभणीमध्ये 10 वर्षींय भंगार वेचणाऱ्या मुलीवर अत्याचार: दोघांविरोधात गुन्हा दाखल, हडको परिसरातील घटना – Parbhani News

स्वारगेट बसस्थानकात अत्याचार प्रकरणानंतर आता परभणीतून संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 10 वर्षीय मुलीवर दोन जणांनी अत्याचार केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.

मिळालेल्या माहितीनुसार परभणीमध्ये भंगार वेचणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आहे. शहरातील हडको परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महिला अत्याचार विनयभंगाचे अनेक प्रकार उजेडात आले आहे.यावरुन विरोधकांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात नेहमीच कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी महिला सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

हे वृत्त अपडेट होत आहे…

हे ही वाचा…

स्वारगेट बलात्कार प्रकरणाची इनसाइड स्टोरी:ताई, बस तिकडे लागली आहे, चल मी तुला घेऊन जातो असे म्हणत आरोपीने केला अत्याचार

पु्ण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीची ओळख पटल्यामुळे त्याच्या कोणत्याही क्षणी मुसक्या आवळल्या जातील असा अंदाज आहे. त्यातच आरोपीने पीडित तरुणीशी ताई म्हणत अत्याचार केल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पूर्ण बातमी वाचा…

स्वारगेट बसस्टँडमधील बसचे चक्रावून टाकणारे PHOTO:बसमध्ये साड्या, अंतर्वस्त्र, कंडोम; येथे रोज रेप होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप

पु्ण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी वसंत मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून बसस्थानकामधील सुरक्षा केबिनची तोडफोड केली. यावेळी मोरे यांनी बसमधील कंडोम्स व साड्यांचा खच दाखवत या ठिकाणी दररोज बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप केला. खाली पाहू बसमधील वस्तुस्थितीचे निवडक फोटो… पूर्ण बातमी वाचा…

Leave a Comment