पुणे स्टेशन येथील पीएमपीएलच्या एका महिला वाहकाला डेपाे मॅनेजरने शरीरसुखाची मागणी केली. सदर महिला शरीरसुख देत नसल्याने डेपाे मॅनेजर याने तिचा वारंवार मानसिक व शारिरिक त्रास देत अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत महिलेने वरिष्ठांकडे तक्रार करुनही दखल घेतली
.
याप्रकरणानंतर संबंधित ३३ वर्षीय महिलेने आरोपी विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी सुनील धाेडीभाऊ भालेकर (वय- ४४, रा.चऱ्हाेली,पुणे), सुनील कुसाळकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला पीएमपीएमएल मध्ये वाहक पदावर काम करत असून सन २०१८ पासून ती कार्यरत आहे. सध्ये पुणे स्टेशन आगार मध्ये ती काम करत आहे. सदर ठिकाणी सुनील भालेकर हा पुणे स्टेशन आगार मध्ये कामास असल्याने तिच्या आेळखीचा आहे. परंतु ताे महिलेचा पाठलाग करुन त्रास देत असल्याने याबाबत महिलेने बंडगार्डन पोलिस ठाऱ्यता तक्रार दाखल केली हाेती. त्यानंतर सदरची केस मागे घण्यासाठी भालेकर याने महिलेस मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिली. त्यामुळे त्याची महिलेच्या तक्रारीनुसार खातेनिहाय चौकशी हाेऊन त्याची बदली न.ता.वा.डी डेपाेला करण्यात आली.
त्यानंतर महिलेने डेपाे मॅनेजर संजय कुसाळकर यांचेकडून हाेत असलेल्या त्रासाबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात अर्ज दिला हाेता. त्याअनुषंगाने तिला बंडगार्डन पोलिस स्टेशनला बाेलवले असता ती दाेन मित्रांसाेबत गेली हाेती. त्यावेळी एका हॉटेल मध्ये ती जेवणास गेली असता, भालेकर याने तिचा पाठलाग केला. ‘कुसाळकर आमचा बाप आहे, कसा गुन्हा दाखल करताे ते बघुन घेताे’ असे बाेलुन त्याने तिला डाेळा मारुन तेथून निघून गेला. सदरचा प्रकार सार्वजनिक ठिकाणी केल्यामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. तसेच याबाबत राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार दिली. त्यामुळे कुसाळकर याने महिलेस निलंबित केले. महिला शरीर सुख देत नसल्याने संजय कुसाळकर त्रास देत असल्याने त्याच्या कार्यालयात जाऊन महिलेने अंगावर पेट्रोल आेतून गोंधळ घातल्यावर याबाबत वरिष्ठांना जाग येऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.