दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा राज्य शिक्षण मंडळाने दिला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील ‘आदर्श ’आणि वैजापूर तालुक्यातील ‘कल्पतरू’ या दोन शाळांची
.
दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानला छेद देणाऱ्या मंडळींविरुध्द पोलीस कारवाई केली जात असून, मंडळाच्या सुचना न मानणाऱ्या शाळा, महाविद्यालयांवर कारवाईचे हत्यार शिक्षण मंडळाने उपसले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणात आढळलेल्या शाळांची मंडळ मान्यता रद्द आणि सामुहिक कॉप्या प्रकरणात दोष आढळून आलेल्या शाळांची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली जात आहे, जिल्ह्यात अशा शाळांची संख्या ६ आहे. असे शिक्षणाधिकारी लाटकर यांनी सांगितले. यापैकी वैजापूर तालुक्यातील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय आणि फुलंब्री तालुक्यातील आदर्श विद्यालय या दोन शाळांची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली जाणार असल्याचे लाटकर म्हणाल्या.
या शाळांची मंडळ मान्यता रद्द होणार
दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्या शाळा, महाविद्यालयांविरुध्द कारवाई केली जात आहे. ज्या शाळांत कॉप्या आढळून आल्या आहेत. त्यांची मंडळ मान्यता रद्द केली जाणार आहे. यामध्ये बोकूड जळगाव येथील श्रीराम विद्यालय, खुलताबाद तालुक्यातील शांताराई कनिष्ठ महाविद्यालय, गंगापूर तालुक्यातील हरिओम ज्युनिअर कॉलेज तुर्काबाद खराडी, न्यू हायस्कूल रघुनाथनगर, राजे शहाजी उच्च माध्यमिक विद्यालय अंबेलोहळ या शाळांची मंडळ मान्यता रद्द केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितले. ओहर येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातील गैरप्रकार प्राथमिक चौकशीत समोर आला असून, त्यासंबधीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या शाळेवर कारवाईचा निर्णय घेतला जाईल. सामुहिक कॉपी झाली की नाही असे विभागीय मंडळ ठरवेल असेही लाठकर म्हणाल्या.