मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे काही धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. सरकारकडे हे फोटो दोन महिन्यांपूर्वीच
.
संतोष देशमुख यांची हत्या करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर लघवी केल्यासारखे म्हणावे लागेल. हे फोटो दोन महिन्यांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांकडे आले असावेत, असा दावा रोहित पवारांनी केला. दोन महिन्यांपूर्वी हे फोटो तुमच्याकडे असताना त्यावेळी धाडसी निर्णय घ्यावा, असे वाटत नसेल, तर तुम्हाला मन आहे का असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. तुमची मैत्री किंवा जे काही संबंध असतील ते कचऱ्यात टाका. पण आजच्या आज धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकारने घेतलाच पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली. कारण राक्षसीप्रवृत्तीचा वाल्मीक कराड हा माणूस धनंजय मुंडेंचा खास असल्याचे सगळ्या जगाला माहिती आहे. दोन महिने हे फोटो येऊन तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही कराडची आणि धनंजय मुंडेंची सरकार म्हणून पाठराखण करत आहात, असे आमचे मत असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला.
गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेना चाबकाने मारले असते काही झाले तरी योग्य निर्णय घेण्याची धमक अजितदादांमध्ये आहे. त्यामुळे दादांनी आज अधिवेशन सुरू होण्याच्या आधी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. पंकजा मुंडेंनाही विनंती करतो की, तुम्ही माध्यमांसमोर या. धनंजय मुंडे तुमचे भाऊ असू द्या. त्यांनी तुम्हाला निवडणुकीत मदत केली, नाही केली हा विषय बाजूला ठेवा. थोरले मुंडे साहेब आज असते तर, त्यांनी धनंजय मुंडेला चाबकाने मारले असते आणि राजीनामा द्यायला लावला असता. आज सरकारने राजीनामा घेतला नाही, तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. महाराष्ट्रात वाढत असलेली ही राक्षसी प्रवृत्ती काढून टाकायची असेल, तर आजच्या आज सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला गेला पाहिजे. तो घेतला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती या सरकारला माफ करणार नाही.
सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे काही लोक मुद्दामहून या प्रकरणाला जातीय रंग देत आहेत. येथे देशमुख परिवाराला जी झळ पोहोचली, तो कुठल्याही समाजाचा असता, तर संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबाच्या मागे राहिला असता. अशा क्रुर पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला आहे. सगळी प्रक्रिया बघता वाल्मीक कराडला 7 ते 8 वर्षांची शिक्षा मिळू शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहून सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे, असे आमचे ठाम मत आहे. काल रात्री तुमची काय चर्चा झाली माहीत नाही. पण अधिवेशन सुरू होण्यापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, असे आमची मागणी आहे, असे रोहित पवार म्हणाले.
खोलात तपास केल्यास सर्वच समोर येईल या प्रकरणाची खोलात जाऊन तपास केला, फोन नंबर चेक केले. पोलिसांना कुणी कुणी फोन केले होते. कुणाची कुठे आणि कशापद्धतीने पाठराखण झाली, हे सर्व तपासले सर्व समोर येईल. आम्ही थेट बोलू शकणार नाहीत. पण आदेश देणार मंत्रीच असेल, तर कुठला पोलिस अधिकारी त्याठिकाणी काम करेल. धनंजय देशमुखही हेच म्हणाले की, पोलिस नसते, तर माझा भाऊ जगला असता. याचा अर्थ पोलिस प्रशासनामुळेच माझा भाऊ मारला गेला, असे त्यांचे मत आहे. पोलिस प्रशासनाच्याबाबतीत लोक असे बोलत असतील, तर हे दुर्दैवी आणि धोक्याची घंटा आहे, असे आमचे मत असल्याचे रोहित पवार म्हणाले.