सेन्सॉर बोर्डाने दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अडवून धरला आहे. नामदेव ढसाळ कोण? हेच आम्हाला माहिती नाही, असा युक्तिवाद त्यांनी या प्रकरणी केला आहे. त्यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्
.
‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित आहे. मराठी व हिंदी भाषेतील या 2 तासांच्या चित्रपटाद्वारे 1970 ते 1975 च्या कालखंडातील युवा क्रांती दल व दलित पँथरच्या चळवळीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटाला जगभरातील 262 फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे. त्याला अनेक पुरस्कारही मिळालेत. पण भारतातच सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी नाकारल्यामुळे निर्माते हैरान झाले.
सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर व सय्यद रबी हश्मी यांनी निर्मात्यांना पाठवलेल्या एका नोटीसीत नामदेव ढसाळ कोण हेच आम्हाला माहिती नसल्याचा अजब दावा केला आहे. नामदेव ढसाळ कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही. त्यांच्या कविता चित्रपटातून वगळल्या तर सेन्सॉर बोर्ड चित्रपटाला परवानगी देण्यावर विचार करू शकतो, असे त्यांनी म्हटले.
मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सेन्सॉर बोर्डावर बसणारे जे कोणते महाभाग आहेत, त्यांना नामदेव ढसाळ माहिती नसतील तर त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामा देणे योग्य राहील, असे ते म्हणालेत.
चित्रपटातील कवितेत शिवीगाळ असल्याचा आरोप
उल्लेखनीय बाब म्हणजे ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट गतवर्षी 1 जुलै रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. पण चित्रपटातील काही कवितांमध्ये शिवीगाळ व अश्लिलता असल्याचे कारण देत बोर्डाने तो अडवून धरला आहे. त्यानंतर निर्मात्यांनी या कविता दलित नेते नामदेव ढसाळ यांच्या असल्याचे स्पष्ट केले. पण अधिकाऱ्यांनी कोण ढसाळ? असा प्रश्न करत त्यांचे स्पष्टीकरण फेटाळून लावले. बोर्डाने वादग्रस्त कविता वगळल्यानंतर चित्रपटाला परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवला. पण या कविता या चित्रपटाचा आत्मा असल्यामुळे निर्मात्यांनी तसे करण्यास नकार दिला. यामुळे हा वाद वाढला आहे.
हे ही वाचा…
स्वारगेट बलात्कार प्रकरणाची इनसाइड स्टोरी:ताई, बस तिकडे लागली आहे, चल मी तुला घेऊन जातो असे म्हणत आरोपीने केला अत्याचार
पुणे – पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीची ओळख पटल्यामुळे त्याच्या कोणत्याही क्षणी मुसक्या आवळल्या जातील असा अंदाज आहे. त्यातच आरोपीने पीडित तरुणीशी ताई म्हणत अत्याचार केल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर
स्वारगेट डेपोतील ‘ती’ शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली:खबरदारी म्हणून कारवाई; पोलिसांना बसमध्ये दत्तात्रय गाडेचा बूट आढळला
स्वारगेट प्रकरणातील आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत फोटो:नेत्याचा फोटोही DP ला; आमदार कटकेंना पुढे येऊन करावा लागला खुलासा
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास वेगवान:आरोपीचे संभाव्य लोकेशन मिळाले, लवकरच अटक होणार – गृहराज्यमंत्री कदम
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार घोषित:दत्तात्रय गाडेबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षीस, पुणे पोलिसांची घोषणा