sharad pawar sanjay raut neelam gorhe akhil bhartiya marathi sahitya sammelan | संजय राऊत जे बोलले ते शंभर टक्के बरोबर: नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे, असे भाष्य करायला नको होते, शरद पवारांची टीका – Mumbai News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी होता. तर संमेलनातील इतर कार्यक्रम हे तालकोट मैदानावर झाले. साहित्य संमेलन यशस्वी झाले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे

.

नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे

नीलम गोऱ्हे यांच्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, नीलम गोऱ्हे यांना चार टर्म कशी मिळाली हे सर्वांना माहीत आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांना असे भाष्य करण्याची गरज नव्हती. नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे होते. तसेच त्यांनी ते भाष्य केले नसते तर बरे झाले असते. संजय राऊत जे म्हणतात ते योग्य आहे.

संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त विधानानंतर नाराजी व्यक्त करत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाला पत्र पाठवले होते. संजय राऊत यांनी आयोजकांवर जाहीर नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

नैतिकता आणि या लोकांचा काही संबंध नाही

पुढे बोलताना शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, नैतिकता आणि या लोकांचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले मी त्या गावात जाऊन आलो आहे. त्या गावातील लोकांच्या भावना मी समजू शकतो. कोणालाही स्वाभिमान असेल अशी व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही. पण संबंध राज्यातून लोकांचा हल्ला होत आहे तरी सुद्धा सत्तेवर आपण बसून राहायचे ही जी भूमिका घेऊन हे लोक वागत आहेत.

Leave a Comment