संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा दिल्याचे अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी म्हटले आ
.
भुजबळ, अजित पवार म्हणतात नैतिकतेवर राजीनामा दिला. पण धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचा न देखील वापरला नाही. त्यांनी त्यांचे ट्विट प्रसार माध्यमांना दाखवला. त्यांनी स्वतःच्या तब्येतीमुळे राजीनामा दिलाय, असे कारण दिले आहे. भुजबळ, आणि अजित पवार म्हणतात नैतिकता म्हणून दिला आहे. नेमका कशामुळे राजीनामा दिलाय, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला? हे सर्व भयानक आहे. आज 84 दिवस झाले आहेत या गोष्टीला. या प्रकरणातील चार्जशीटमधील फोटो हे सरकारने आधीच पाहिलेले असणार. त्यातील फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहिले असतील ना? मग राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी सीडीआर समोर आणलेले आहेत. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संवाद हत्येच्या अर्धा तासांमध्ये झाला, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? 84 दिवस याकडे कानाडोळा केला. आता काय म्हणतात नैतिकतेवर राजीनामा दिला. पण ज्यांनी राजीनामा दिले ते वैद्यकीय कारणाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले. अहो राज्याला किती फसवणार? सगळे राज्य हताश झाले आहे. सुरेश धस म्हणतात ते सत्य आहे. धनंजय मुंडे आणि नैतिकता याचा दुरान्वये संबंध येत नाही. ते आज मुंडेंच्या ट्विट वरून स्पष्ट होतो. असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
वाल्मीक कराडचा धनंजय मुंडेंना फोन कृष्णा आंधळे गायब होतोच कसा? असा सवाल त्यांनी केला. विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी वाल्मीक कराड याला फोन केले आहेत. त्याचा व्हिडिओ कॉल संपल्याबरोबर वाल्मीक कराड याने धनंजय मुंडे यांना कॉल केले आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे संपर्कात होते, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
मुंडेंची आणि नैतिकतेची भेट झाली नाही मला सरकारला विचारायचे आहे तुम्ही म्हणताय नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय. मात्र ज्याने राजीनामा दिलाय तो म्हणतोय तब्येतीमुळे दिला सुरेश धस म्हणतात ते बरोबर आहे… धनंजय मुंडे आणि नैतिकता यांची कधी भेट झाली नाही, अशी टीका खासदार सुळे यांनी केली आहे. वाल्मीक कराड असलेल्या जेलमध्ये सीसीटीव्ही सुरू नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.