स्वारगेट येथील डेपो मध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा बसने घरी गेला होता. त्यानंतर बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात देखील तो हजर होता. मात्र दुपारी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी
.
पुण्यात स्वारगेट डेपोमध्ये पार्क केलेल्या बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गुरुवारी रात्री उशिरा शिरूर येथून अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पुणे डीसीपी निखिल पिंगळे यांनी सांगितले की, आरोपीला रात्री 1:30 वाजता गावातील एका शेतातून अटक करण्यात आली. डीसीपी पिंगळे म्हणाले की, अटकेच्या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान गावातील लोकांनी आम्हाला साथ दिली. गावकऱ्यांनी आरोपीला ओळखले आणि पोलिसांना कळवले. तसेच त्याला पकडण्यातही मदत केली. आरोपीला पुढील चौकशीसाठी पुण्याला आणण्यात आले आहे. आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे याने 25 फेब्रुवारी रोजी सरकारी स्वारगेट डेपोमध्ये हा गुन्हा केला. त्याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षीस होते.
पश्चात्ताप झाला, पोलिसांना सरेंडर व्हायचंय
स्वारगेट येथील तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे गेल्या दोन दिवसापासून शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसात लपून बसला होता. पोलिसांनी गुनाट गावात जवळपास 50 तास ऑपरेशन राबवले. मात्र तो सापडला नव्हता. अखेर भूक लागल्याने रात्री बाराच्या सुमारास तो गावातील एका नातेवाईकांच्या घरी गेला. तिथे त्याने मला प्रचंड भूक लागली असून काहीतरी खायला द्या, अशी मागणी केली. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला खायला आणि पाण्याची बाटली दिली. त्याचवेळी दत्तात्रय गाडेने आपल्याला पश्चात्ताप झाला आहे, असे नातेवाईकांना सांगितले. तसेच जे काही केले ते चुकीचे आहे. मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय, असे देखील तो म्हणाला. त्यानंतर पाण्याची बाटली घेऊन तो निघून गेला. त्याचवेळी नातेवाइकांनी पोलिसांना गाडे आल्याची माहिती दिली आणि त्यानंतर तो लगेचच पोलिसांना सापडला.
पोलिसांच्या 13 टीम तैनात दत्तात्रय गाडेची माहिती नातेवाइकांनी दिल्यानंतर पोलिस तात्काळ सक्रिय झाले. पोलिसांच्या 13 टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या होत्या. तसेच डॉग स्क्वाड देखील तैनात होते. त्यानंतर आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले. तो उसात लपून बसलेला होता. गाडे गेले दोन दिवसापासून उसाच्या शेतातच राहत आणि झोपत होता. मात्र भूक लागल्याने तो नातेवाईकांच्या घरी गेला आणि पोलिसांच्या ताब्यात सापडला.