स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. त्यातील आरोपी दत्तात्रय गाडेला पाेलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पाेलिसांनी १५ दिवसातच दाेषाराेपपत्र दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार पिडितेचा न्यायालयात कलम
.
घटनेच्या दिवशी पिडितेच्या अंगावरील कपडे जप्त करुन त्यावरील फाॅरेन्सिक नमुने घेऊन त्याची आराेपीच्या रक्त नमुन्याशी जुळवाजुळव करण्यात येणार आहे. तो अहवाल पुरावा म्हणून न्यायालयात सर्वात महत्वाचा ठरताे. ससून रुग्णालय पिडितेचा अंतिम वैद्यकीय अहवाल लवकरच देणार आहे. त्यासाेबत फाॅरेन्सिक पथकाने घटनेच्या दिवशी संबंधित बसमध्ये जमा केलेल्या नमुन्याच्या आधारे अहवाल तयार करण्याची चाचपणी सुरु केली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
७.५ कोटींची ५ मोबाईल सर्व्हिलन्स वाहने खरेदी
पाेलिसांनी पिडितेची आई, भाऊ व तिच्या एक मित्राचा तसेच ती स्वारगेटला ज्या कॅबमधून आली तो कॅबचालक आणि ज्या बसमध्ये घटना घडली त्या बसच्या वाहकाचा जबाब नाेंदवला. पाेलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की पुणे पाेलिसांनी ५ माेबाईल सर्व्हिलन्स व्हिजलन्स वाहने घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका वाहनावर दीड काेटींचा खर्च अपेक्षित आहे.