Swargate Rape Case NCP, VBA and Sambhaji Brigade Protest; Demand for Home Minister’s resignation | स्वारगेट बलात्कारप्रकरणी निषेधाचा धडाका: राष्ट्रवादी, वंचित आणि संभाजी ब्रिगेडचे आंदोलन; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी – Pune News

पुणे शहरातील सर्वांत वर्दळीच्या, रहदारीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या स्वारगेट बस डेपो येथे एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक व निंदनीय आहे. लक्ष्मीचे, सरस्वतीचे रूप असलेल्या आपल्या भगिनीवर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात झालेला अत्य

.

पुण्यातील या दुर्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरवारी स्वारगेट चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास प्रशांत जगताप,अश्विनी कदम, किशोर कांबळे, स्वाती पोकळे,मनाली भिलारे, मंजीरी घाड़गे,फईम शेख, गणेश नलावडे, नितिन कदम,श्रद्धा जाधव, निलेश वरे,रोहन पायगुडे, मंगलताई पवार,शशिकांत तापकीर तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित, संभाजी ब्रिगेडचे आंदोलन यानंतर स्वारगेट एसटी स्थानक येथे संभाजी ब्रिगेडचे पदधिकारी यांनी देखील आंदोलन करत, आरोपीची अटक लवकर करण्याची मागणी केली. तर वंचित बहुजन आघाडीने प्राध्यापक अंजली आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करत, महिला अत्याचारावर सरकार कोणत्याही गंभीरपणे उपयोजना राबवत नसल्याची जाहीर टीका केली.

Leave a Comment