पुण्यश्लोक अहिल्यादेवी सांगितीक गौरव गाथा हा शासनाच्या उपक्रम नवीन पिढीला प्रेरणादायी आहे. अशा कार्यक्रमातून अहिल्याबाई होळकर यांनी निर्माण केलेल्या कार्याला उजाळा मिळतो. संपूर्ण हयातीत जवळपास २८ वर्षे इंग्रजांची लढणाऱ्या लढवय्ये राणी म्हणून त्यांची
.
विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबईच्या वतीने नुकताच अहिल्यादेवी होळकर गौरव गाथा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर बोलत होते. नवीन पिढीला अहिल्यादेवी होळकर यांचे कार्याची गाथा विचारांचा प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. या कार्यक्रमाचे नियोजन हिंदी विभागाचे प्रा. डॉ. भरत जवंजाळ यांनी केले होते. याप्रसंगी कार्यकारिणी सदस्य संस्कार भारती अमरावती येथील सचिन गिरी सांस्कृतिक संचालनालय प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या सामाजिक, राजनैतिक आणि कल्याणकारी कार्याबद्दल माहिती दिली. तसेच अहिल्यादेवी च्या कार्याची यशोगाथा सांगीतिक स्वरूपात सादर करणाऱ्या कलाकारांचे आभार मानले.
गौरव गाथेची संगीतमय झलक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी सांगितीक गौरवगाथा सादर करणारे गायक तनुश्री भालेराव त्यांचे सहकारी राजू सोनवणे व आफ्टर पेड वादक यश कदम, संगीतकार स्वप्निल कांबळे, संगीतकार स्वप्नील शिरसाट सिंथो साईजरवर, ढोलकी वादक विपुल गवई होते. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकर्तुत्वाची संगीतमय झलक या निमित्ताने अनुभवता आली. प्रवीण देशमुख, तसेच सोबत ध्वनी यंत्र व्यवस्थापन सांभाळणारे अशोक शिरसाठ अन्य सहकारी होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिता कौर यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक सांस्कृतिक संचालनालय प्रतिनिधी सचिन गिरी यांनी केले. कार्यक्रमामध्ये प्रा. व्ही. यू. मोरे, प्रा. भूतेकर, प्रा. गवई, प्रा .खंदारे, प्रा. कापसे, प्रा. वाघमारे, प्रा. बानाईत, विद्यार्थी आदी उपस्थित हेाते.
सामाजिक संघ रचनेत महिलांना नेहमी दुय्यम स्थान देणाऱ्या मानसिकतेला त्यांनी आपल्या कर्तृत्वाने खोडून काढले. समाजात अतिशय प्रतिकूल परिस्थिती आत्मविश ्वासाने राज्यकारभार करणाऱ्या अहिल्यादेवी महिला सक्षमीकरणाची उत्कृष्ट उदाहरण होय असे प्राचार्यांनी प्रतिपादन केले. आजच्या समस्त महिला वर्गांनी यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.