अमरावती येथे आयोजित केलेल्या ४६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत दोन राज्यांनी विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या गटात छत्तीसगढने मध्यप्रदेशला तर महिलांच्या गटात महाराष्ट्राने पंजाबला पराभूत केले. दोन्ही अंतिम सामन्यात विजेत्या संघांनी ५ गुणांची आघ
.
विभागीय क्रीडा संकुलात पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशभरातून महिलांचे २५ आणि पुरुषांचे २९ संघ सहभागी झाले होते. अमरावती जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनने भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
२६ फेब्रुवारीला झालेल्या समारोप सोहळ्यात विजेत्या संघांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सॉफ्टबॉलचे संस्थापक वाय. जे. अशर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुरजसिंग येवतीकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर रुपाली इंगोले-ढोणे यांनी आभार मानले.