Vasant More Ground Report On Pune Rape Case Place Target St Administration | स्वारगेट बसस्टँडमधील 4 बसचा लॉजिंग म्हणून वापर: कंडोमचा खच; वसंत मोरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाने सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली – Pune News

शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय फोडले असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार घटनेप्रकरणी वसंत मोरे यांनी ही कारवाई केली आहे. याचा व्हिडिओ देखील वसंत मो

.

वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असे सवाल करत, वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली.

वसंत मोरे यांनी यावेळी संपूर्ण स्वारगेट आगार परिसरात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो याचा अर्थ काय? असा सवालही वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. या बलात्काराला सुरक्षा रक्षकच जबाबदार आहेत. या ठिकाणी रोज कोणाला तरी आणले जाते आणि इथे हे सगळे धंदे चालतात. तसेच त्यांनी यावेळी काही बस देखील दाखवल्या जिथे अनेक निरोधचे पाकीट पडलेली होती. याचा अर्थ या ठिकाणी सर्रासपणे बसमध्ये लॉजिंगची सुविधा करण्यात आली आहे, असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.

आगारप्रमुख या सगळ्यासाठी जबाबदार

वसंत मोरे म्हणाले, या ठिकाणी 20-20 सुरक्षा रक्षक असून झोपा काढतात. या ठिकाणी महिलांच्या साड्या, कंडोमचे पाकीट, दारूच्या बाटल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की सुरक्षा रक्षकांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडतात. सुरक्षा रक्षकांची एवढी संख्या असताना, चहूबाजूने बंदिस्त असताना या घटना कशा घडतात? असा प्रश्न वसंत मोरे यांनी विचारला आहे. या घटनेची माहिती आगारप्रमुखाला माहिती नाही म्हटल्यावर काय म्हणायचे? आगारप्रमुख आणि या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा वसंत मोरे यांनी दिला.

शेकडो कंडोमची पाकिटे पडलेली आहेत

इथे रोज बलात्कार होत आहे, शेकडो कंडोमची पाकिटे पडलेली आहेत इथे. इथे वीस लोक नेमलेली आहेत, ही वीस लोक काय करतात? असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे. शिवशाही नाव असलेल्या बसमध्ये असले प्रकार करताना लाज वाटत नाही का यांना? आम्हाला जेव्हा याची माहिती मिळाली की एवढ्या मध्येपर्यंत हे प्रकार सुरू असतात. इथे येताना सुरक्षा रक्षकांची केबिन ओलांडून यावे लागते. याचा अर्थ यात एसटीचे कर्मचारी सहभागी असतात, सुरक्षा रक्षक सहभागी आहेत, असे वसंत मोरे म्हणाले.

स्वारगेट बलात्कार प्रकरणाची इनसाईड स्टोरी:ताई, बस तिकडे लागली आहे, चल मी तुला घेऊन जातो असे म्हणत आरोपीने केला अत्याचार

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीची ओळख पटल्यामुळे त्याच्या कोणत्याही क्षणी मुसक्या आवळल्या जातील असा अंदाज आहे. त्यातच आरोपीने पीडित तरुणीशी ताई म्हणत अत्याचार केल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. हेही वाचा

पुण्यातील घटनेला आगारप्रमुख जबाबदार:तातडीने निलंबित करण्याची रुपाली ठोंबरेंची मागणी, सुप्रिया सुळेंचा गृहखात्यावर हल्लाबोल

पुण्यामध्ये एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकार घडलेली ही घटना दुपारी समोर आली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना म्हणजे पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यात गृहखात्याला आलेले अपयश असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. या घटनेसाठी स्वारगेट बसस्थानकाचे आगारप्रमुख जबाबदार असून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. हेही वाचा

Leave a Comment