Vijay Wadettiwar Criticizes Pune Police Commissioner State Law And Order | नागपूरचे पोलिस आयुक्त पुण्यात फक्त हप्ते वसुलीसाठी पाठवले का?: विजय वडेट्टीवारांचा सवाल, राज्यात कायदा अन् सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत – Nagpur News

पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे. महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता, पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बलात्कार होऊन देखील अजूनही आरोपी पकडला जात नाही, यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे न

.

दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पुण्याचे पोलिस कमिशनर आधी नागपूरमध्ये होते. पुण्यात गेल्यावर गुन्हेगारांची परेड केली, पुढे काय झाले? आता पुण्यात जाऊन हफ्ते वसूली करण्यात व्यस्त आहेत का? पोलिसांचा धाक उरलेला नाही, त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना वाढ.

आता बैठक बोलावून काय फायदा

विजय वडेट्टीवार म्हणाले की, गुन्हा घडून गेल्यावर सरकार जागे होते. राज्यात कोलमडलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत येणाऱ्या अधिवेशनात आम्ही प्रश्न उपस्थित करू. एसटी स्थानकात अत्याचार झाल्यावर परिवहन मंत्री आता बैठक बोलवत आहे, याचा उपयोग नाही.

तिथे तोंड शिवली गेली का

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना सुरक्षा दिली जाते. राहुल सोलापूरकर असेल किंवा कोरहटकर असेल यांच्यावर कारवाई होत नाही. उलट ते आरएसएस संबंधित असल्याने त्यांना अभय दिले जाते.भाजप यांच्या विरोधात निषेध करत नाही, आता तोंड का शिवली गेली,असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

बदलापूर संस्थाचालकावर कारवाई नाही

विजय वडेट्टीवार म्हणाले की, आतापर्यंतचा रेकॉर्ड पहिला सत्तेमधील असलेल्या लोकांशी संबंधित असलेल्याच लोक महिलांवर अत्याचार करताना दिसत आहेत. बदलापूर घटनेमध्ये अजूनही ही संस्था चालकावर कारवाई झाली नाही. आरोपीला एककाउंटरमध्ये मारून त्याला अभय देण्याचे काम राज्यामध्ये सुरू आहे. त्यामुळे त्याही आरोपीला जर उद्या अभय मिळाले तर वावगे ठरणार नाही. शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही, तर तिथले पोलिस कमिशनर काय करत आहे? चॉकलेट खाऊन बसले आहे का? ते हप्ते वसुलीसाठी आहे का??

Leave a Comment