Won a prize of 2 lakhs for a water-powered bike | जेएसपीएमच्या विद्यार्थ्यांची कमाल: पाण्यावर चालणाऱ्या दुचाकीसाठी 2 लाखांचे बक्षीस जिंकले – Pune News

विकसित भारताचे स्वप्न आपल्याला २०४७ पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, अशा प्रमुख योजनांना बळ द्यावे लागणार आहे. त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्पांची हॅकेथ

.

विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘इनोव्हेशन फाऊंडेशन’च्या वतीने ‘इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०’ या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचा समारोप जल्लोषात झाला. यावेळी पाण्यावर चालणाऱ्या दुचाकीची प्रणाली निर्माण करणाऱ्या हडपसर येथील जेएसपीएम महाविद्यालयाच्या टीम ॲक्वाड्रोव्हने पहिल्या क्रमांकाचे २ लाखांचे पारितोषिक पटकावले. या समारंभात सुमारे ७.५ लाखांपेक्षा अधिक पारितोषिके २५ पेक्षा अधिक संघाना प्रदान करण्यात आली. देशभरातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ३२७ संघांच्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी कृषी, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील विविध सामाजिक समस्यांवर उपाय शोधले. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, वाहनचालक प्रशिक्षण संस्थेचे (आयडीटीआर) प्राचार्य संजय ससाणे, इनोव्हेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, एआयएसएसएमएस आयओआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने, जिल्हा परिषदेचे शिक्षक बालाजी जाधव, डॉ. प्रज्ञा काळे आदी उपस्थित होते. सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच तज्ज्ञ, औद्योगिक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या पॅनलने प्रकल्पांचे परीक्षण केले.

डॉ. देवळाणकर म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यापूर्वीचे शैक्षणिक धोरण हे प्रामुख्याने थेअरी अभ्यासक्रमावर आधारित होते. मात्र, आताच्या धोरणात प्रात्यक्षिक शिक्षणावर आणि इंटर्नशिपवर भर देण्यात आहे. पुढील २५ वर्षात आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे. आपली अर्थव्यवस्था १० ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायचा आहे. त्यासाठी स्टार्टअप आणि उद्योगांची निर्मिती करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य भारतीयांचे जीवनमान उंचविण्यासाठी, योजना आणि ध्येयधोरणांवर काम करावे लागेल. या दोन पद्धतीने आपल्याला देशाचा विकास साधात विकसित भारताची निर्मिती करावी लागेल. आगामी काळात आपल्याला तंत्रज्ञानाची कास धरून, सामाजिक समस्या सोडवाव्या लागतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आपले नवे उद्योग उभे करावे लागणार आहे. त्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशनद्वारे आयोजित हॅकेथॉन स्पर्धांचा फायदा होणार आहे .त्यातूनच नवउद्योजकांची निर्मिती होणार असून, अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment