गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर नगरपालिकेत कारभार प्रशासन हाकत आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने कामे होण्यास विलंब लागत आहे. अधिकारी आणि ठेकेदार लॉबीमुळे विकासकामे निकृष्ट होत आहेत. विकासाला खीळ बसली आहे. शहरातील रस्त्यांची, उद्यानांची, नगरपालिका शाळांची अव
.
शहरात गल्ली बोळातील कचऱ्याचे ढिगारे, रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि धुळीचे लोट पाहता पंढरपूर शहर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, यावर विश्वास बसत नाही.
सुमारे ९०० घरांची प्रधान मंत्री आवास योजना अशीच धूळखात पडून आहे. या योजनेत झालेल्या कमिशन खोरीमुळे ही योजना लाभार्थ्यांसाठी मात्र न परवडणाऱ्या भावात गेली आहे. पंढरपूर नगरपालिकांच्या शाळांची अवस्था कोणत्याही शिक्षण प्रेमी नागरिकांना पाहवत नाही. पालिकेची एकाही शाळेत पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळत नाही. त्यामुळे शिक्षक असूनही विद्यार्थी संख्या मात्र दरवर्षी घसरत आहे. अशा शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे. मात्र पालिका शाळांची अवस्था सुधारावी यासाठी प्रशासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दिसून येत आहे. शहरातील सुमारे ८० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेले नामसंकीर्तन सभागृहाचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. पुढील सहा महिने हे काम पूर्ण होण्याची शक्यता अजूनही दिसत नाही. पंढरपूर शहिरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहे.
नगरपालिका शाळांची दैन्यावस्था
बैठक घेऊन कारभारात लक्ष घालणार शहरातील समस्या, रखडलेली विकास कामे याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. आम्ही शासकीय पातळीवर पाठपुरावा करून करोडो रुपयांचा निधी आणत असतो, मात्र त्याचा योग्य विनियोग होत नसेल तर ते चुकीचे आहे. निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी सूचना करू. लवकरच सर्व विभागाच्या आढावा बैठका घेऊ. समाधान आवताडे, आमदार
विकास कामे संथगतीने सुरू आहेत
पाच वर्षे झाली उद्याने बंद, ज्येष्ठांची गैरसोय पंढरपूर शहरात असलेली दोन्ही उद्याने मागील पाच वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. देखभाल, दुरुस्ती न केल्यामुळे या उद्यानांची अवस्था उकिरड्यासारखी झालेली आहे. विशेष म्हणजे नागरोत्थाण योजनेतून या दोन्ही उद्यानांचा पुनर्विकास करण्यात येत असला तरी गेल्या वर्षभरापासून हे काम रखडलेले आहे. आणखी वर्षभर ही काम पूर्ण होईल अशी परिस्थिती नाही.