एसटी आवारात खासगी सुरक्षा पहिली जाते त्याकरीता त्यांना पैसे दिले जातात.याबाबत आगर प्रमुख यांनी देखरेख ठेवणे आवश्यक आहे. पोलिस देखील याजागी गस्त घालत असतात. स्वारगेट घटनेत परिवहन मंत्री यांनी याबाबत आढावा बैठक आज मुंबईत घेतली आहे. स्वारगेट परिसरात 202
.
स्वारगेट एसटी स्थानक येथे शिवशाही बस मध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याने बलात्कार केल्याचा प्रकार घडल्यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरवारी स्वारगेट एसटी स्थानक येथे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पुणे पोलिस आयुक्त कार्यालय येथे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी तपासाबाबत आणि पुढील उपाययोजना संदर्भात सविस्तर बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पोलिसांकडे आरोपीचे लोकेशन
योगेश कदम म्हणाले की, स्वारगेट येथे जी घटना घडली त्याची माहिती घेतली असून घटनास्थळी कहाणी केली. फिर्याद ही तात्काळ पोलिसांनी घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज पाहणी करत अर्ध्या तासात आरोपी निष्पन्न केला. त्याला पाठलाग करत त्याचा शोध सुरू केला. त्याचे संभाव्य लोकेशन पोलिसांकडे आहे त्याचा मागावर पोलिस पथक असून त्याला लवकर अटक केली जाईल.
पोलिसांचे दुर्लक्ष झाले नाही
योगेश कदम म्हणाले की, या घटनेची माहिती तात्काळ दिली नाही कारण आरोपी अलर्ट होऊ नये यासाठी दक्षता पोलिसांनी घेतली. आरोपी आणखी लांब पळून जाण्याची शक्यता आहे. आरोपीस लपवणे प्रयत्न झाला नाही तर गुप्तता पाळली गेली. ही घटना एसटी स्थानक आवारात घडली आहे. तिथे पोलिसांनी रात्री किती गस्त घातली याबाबत माहिती घेतली. रात्री दीड वाजता आणि तीन वाजता पोलिस निरीक्षक त्याठिकाणी गस्त घालून गेले आहे. पोलिसांचे दुर्लक्ष झाले नाही. आरोपीवर पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. शहरातील आरोपी यांची माहिती पोलिस ठेऊन निरीक्षण केले जाते.
आवाज न झाल्याने आजूबाजूला समजले नाही
योगेश कदम म्हणाले की, जे आरोपी ग्रामीण भागातून शहरात येतात त्यांच्यावर शहर पोलिस लक्ष्य नसते. याबाबत पुढील काळात आणखी उपाययोजना करण्यात येत आहे. सीसीटीव्ही संख्या पुण्या सारख्या शहरात वाढवले जात आहे. फेस रेकॉग्निशन माध्यमातून गुन्हेगार ओळख करण्याचा प्रयत्न केला जाईल. आरोपी ताब्यात आल्यावर पुढील गोष्ट लक्षात येईल. घटना घडल्यावर आजूबाजूला लोक असून आरडाओरड, हाणामारी न झाल्याने आरोपी गुन्हा सहज करू शकला आहे.