[ad_1]
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे यात्रेतील भांडण सोडवण्याच्या कारणावरून सहा जणांनी केलेल्या अमानुष मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी ता. २४ गुंडा येथील सहा जणांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
.
औंढा नागनाथ तालुक्यातील करंजाळा येथील धनंजय कदम हे रविवारी ता. २३ दुपारी बैल बाजार येथे आले होते. यावेळी औंढा तालुक्यातील गुंडा येथील सहा जण जवळाबाजार येथे आले. यावेळी त्यांनी धनंजय यांच्याशी वाद सुरु केली. बाराशिवयात्रेत झालेला वाद सोडण्यासाठी का आला होता या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. मात्र धनंजय यांनी त्यांची बाजू मांडण्यापूर्वीच सहा जणांनी त्यांना चाकू, लोखंडी साखळी, लोखंडी रॉड, कात्री, बेल्टने मारहाण सुरु केली. अचानक सहा जणांकडून सुरु झालेल्या मारहाणीमुळे त्यांना बचावाची संधीही मिळाली नाही.
यामध्ये धनंजय यांच्या पाठीवर, मानेवर मारहाणीचे वळ उमटले तर पाठ काळीनिळी झाली होती. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या धनंजय यांना उपचारासाठी जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी धनंजय यांच्या तक्रारीवरून ओंकार भालेराव, गजानन पावडे, युवराज शिंदे, किरण मीठापुरे, प्रभाकर कवाळे, गोपाळ आखरे (रा. गुंडा) यांच्या विरुध्द औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
[ad_2]